Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघड, दोघांना अटक



सोलापूर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोकड आणि दुचाकीसह एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील दत्त चौक येथील 'राजेंद्र ज्वेलर्स'च्या दुकानाजवळून चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा पाठलाग करून आरोपींनी त्यांना धमकावले. त्यांच्या हातातील १ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून आरोपी युनिकॉर्न मोटरसायकलवरून पसार झाले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीसह (MH-13-DF-5334) थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून  आरोपी मल्लिनाथ राजशेखर जवळगी वय ३६ वर्षे, व्यवसाय: ड्रायव्हर, राहणार उत्तर कसबा शेटे वाडा, सोलापूर; मूळ राहणार सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट नागेश मल्लिनाथ बळते वय १८ वर्षे २० दिवस,राहणार उत्तर कसबा शेटे वाडा, सोलापूर अशी नवे आहेत आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली रु. १,००,०००/- रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रु. १,००,०००/- किमतीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Post a Comment

0 Comments