Ticker

6/recent/ticker-posts

रमेश कदमांवर सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद

 


सोलापूर - आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर शहरातील चार पुतळा परिसर व श्रमिक पत्रकार संघ येथे सकल मातंग समाजातर्फे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान रमेश कदम यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याविषयी बदनामीकारक आणि अपमानकारक वक्तव्य केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी भवानी पेठ येथील रहिवासी अमितकुमार सिद्धराम कांबळे (वय ४२) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक सुतार अधिक तपास करत आहेत

Post a Comment

0 Comments