Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्यासाठी चालकाला आमिष; दोघांवर गुन्हा दाखल

 


सोलापूर - अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदारांच्या पत्नी व मुलाला घेऊन महावीर चौकातील प्युमा शोरूम येथे खरेदीसाठी आले होते. आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये गेल्यानंतर चालक सुरवसे हे बाहेर थांबले होते.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५) व ५५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सदाशिव सावंत करत आहेत.

Post a Comment

0 Comments