सोलापूर - उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांचा गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी सोलापूर दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध संस्थांना सदिच्छा भेट देण्यासोबतच महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील हे १९ ऑगस्ट रोजी रात्री १०:४० वाजता मुंबईहून सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरकडे रवाना होतील. गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी सकाळी ६:४५ वाजता त्यांचे सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे काही काळ राखीव वेळेनंतर, सकाळी ९:०० वाजता ते अक्कलकोट रोड येथील ब्रह्ममठ होटगी शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट देतील.
मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आढावा बैठक-
सकाळी १०:१५ वाजता हॉटेल बालाजी सरोवर (आसरा चौक, होटगी रोड) येथे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभाग 'SIR' संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील.
त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता सात रस्ता येथील 'हॉटेल प्रथम' येथे 'आईशक्ती फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची विशेष बैठक पार पडेल. या सर्व कार्यक्रमानंतर सायंकाळी ६:०० वाजता ते वाहनाने मिरज (जि. सांगली) कडे प्रयाण करतील व तेथे शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील

0 Comments