Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग । बार्शी शहर पोलिसांची अवैध गुटख्यावर मोठी कारवाई; २७,१८० रुपयांचा साठा जप्त, एक आरोपी अटकेत

 

बार्शी - बार्शी शहर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत २७,१८० रुपये किमतीचा प्रतिबंधात्मक गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बी.आय.टी. कॉलेज चौक बायपासवर कारवाई -

पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सपोनि अनिल धानवे, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ विलास आडसुळ, पोकॉ कदर तांबोळी, पोकॉ सचिन देशमुख आणि चालकपॉ मस्के हे भगवंत रथ महोत्सवाच्या मार्गाची पाहणी करत होते. यादरम्यान सपोफौ अजित वरपे यांना बातमीदारामार्फत बी.आय.टी. कॉलेज चौक बायपास रोडवर एक इसम बंदी असलेला गुटखा घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव अविनाश बबन शिंदे (वय ४२, रा. कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे सांगितले.

२७,१८० रुपयांचा गुटखा जप्त -

पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातील तीन पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला.एम सुगंधी तंबाखू: ६,००० रुपये (१० पुडे),बाब तंबाखू: १५०० रुपये (२५ पुडे),बाबा १२० पान मसाला: १५०० रुपये (२४ पुडे),डायरेक्टर पान मसाला: ९७५० रुपये (१५ पुडे,९९९ तंबाखू: २२५० रुपये (१५ पुडे) असा एकूण २७,१८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

विभागीय पथकाची कामगिरी - 

या प्रकरणी पोकॉ/६७ कादर तांबोळी यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सपोनि अनिल धानवे, सपोफौ अजित वरपे, पोकॉ कादर तांबोळी, पोकॉ सचिन देशमुख व चालकपॉ मस्के यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments