मोहोळ - उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युतत्र दिलं आहे. त्यांनी जयकुमार गोरेंबाबत शिवराळ भाषेचा वापर केला होता. यानंतर भाजपचे कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदवण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांनी शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांची ही टीका भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. भाजपचे कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.पालकमंत्री गोरे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करताना संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता.
0 Comments